मराठी भाषा संवर्धन समितीचे पुनर्गठन

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका मराठी भाषा संवर्धन समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. शहरातील कला, शिक्षण व साहित्य क्षेत्रातील मंडळीची समिती गठीत करण्यास महापालिका क्रीडा समितीने शुक्रवारी (दि. 14) झालेल्या बैठकीत मान्यता दिली.

समितीचे सभापती संजय नेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पार पडली. औद्योगिकनगरीमध्ये बहुभाषिक वर्ग एकत्र आल्याने मातृभाषा मराठी लोप पावत चालली आहे. त्यामुळे मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी महापालिकेतर्फे मराठी भाषा संवर्धन समिती स्थापन करण्याचा निर्णय 6 सप्टेंबर 2016 मध्ये घेण्यात आला. त्यानुसार ही समिती पुनर्गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीमध्ये एकूण 24 सभासद असून त्यामध्ये लोकप्रतिनिधी, महापालिका कर्मचारी, महापालिका शाळेतील शिक्षक यांचा समावेश आहे. त्यानुसार ही समिती पुन्हा गठीण करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सभापती संजय नेवाळे, पदसिद्ध सदस्य व सचिव म्हणून शिक्षणाधिकारी ज्योत्सना शिंदे, पदसिद्ध सदस्य व सहसचिव म्हणून शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी पराग मुंडे, तसेच राजन लाखे, डॉ. शहाबुद्दीन नूर महोमद्द पठाण, धनंजय भिसे, राजाभाऊ भैलुमे, संजय पवार, गुलाबराव देशमुख, अपर्णा मोहिले, राजेंद्र कांकरीया, राजश्री मराठे, विनीता येनापुरे, रजनी शेठ, राज आहिरराव, संभाजी बारणे, स्नेहल अग्निहोत्री, तुकाराम पाटील, झुंजार सावंत, सुरेखा कुलकर्णी, अविनाश हरिशचंद्र, संतोष उपाध्ये, अंबरनाथ कांबळे, सुजाता पालांडे, अपर्णा डोके यांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी एप्रिल 2018 मध्ये समिती गठीत करण्यात आली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)