मराठी भावगीतांना समृद्ध करणारे व्यक्तिमत्व हरपले – मुख्यमंत्री

ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांच्या निधनाने शब्दांसोबतच सुरांवर प्रभुत्व असलेला आणि मराठी भावगीतांचे विश्व समृद्ध करणारा एक अस्सल कलावंत हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्यमंत्री म्हणाले, अनेक भावगीतांसह श्री. देव यांनी नाटकांना दिलेले संगीतही कायम स्मरणात राहील. एक अष्टपैलू संगीतकार म्हणून यश मिळवण्यासोबतच त्यांनी लिहिलेली अनेक गीतेही लोकांच्या ओठावर सहज येतात. नव्या पिढीच्या आवडींशी नाळ जोडतानाच संगीताचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांची अविरत धडपड होती. त्यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)