मराठी पाट्या न लावल्यास खळखट्याक : मनसेचा इशारा

महाबळेश्‍वर तहसीलदार, पाचगणी आणि महाबळेश्‍वरच्या पालिका मुख्याधिकाऱ्यांना मनसेचे निवेदन

भिलार – पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्‍वर तालुक्‍यात मनसेने मराठी पाट्यांबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून 20 दिवसाच्या अल्टीमेममध्ये जर पाट्यांचे मराठीकरण झाले नाही तर मात्र खळखट्याक आंदोलन हाती घेतले जाण्याचा इशाराच निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत मनसेने महाबळेश्‍वर तहसीलदार, पाचगणी आणि महाबळेश्‍वरच्या पालिका मुख्याधिकारी व पोलीस ठाण्यात याविषयी निवेदन दिले आहे. यावेळी मनसेचे तालुका उपाध्यक्ष नितीन पार्टे, पांचगणी शहर अध्यक्ष शिवाजी कासुर्डे , तालुका विभाग अध्यक्ष विशाल गोळे, महाबळेश्‍वर उप शहर अध्यक्ष ओंकार नाविलकर,वैभव गोळे व कार्यकर्ते उपस्थित होते.

या निवेदनात राज्यात मराठीला राज्यभाषेचा दर्जा आहे. आणि आपण महाराष्ट्रात राहूनही मराठीचा विसर पडल्याचे चित्र आहे. “दुकाने संस्था राजभाषा अधिनियम 1948′ अन्वये दुकाने व संस्थांनी आपले नामफलक मराठी भाषेत लावणे व व्यवहार करणे बंधनकारक आहे. व्यवसाय उद्योग करणारी मंडळी ज्या राज्यात आर्थिक व्यवहार करून अर्थार्जन करतात, तेथील भाषेचा व मराठी लोकांचा ही माणसे मराठी भाषेच्या पाट्या न लावून अपमान करीत आहेत, असे म्हटले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाबळेश्‍वर तालुक्‍याच्या वतीने शहरातील दुकानदारांनी 20 दिवसांत मराठी पाट्या न लावल्यास मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते आदोलन छेडून पाट्या बदलण्याची मोहीम हाती घेतील. व त्यानंतर दुकाने हॉटेल मालकांच्या बोर्डाचे होणाऱ्या नुकासानिस ते स्वतः जबाबदार राहतील. असा इशारा देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)