मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे पुरस्कार जाहीर

पुणे – अखिल भारतीय नाट्य परिषद पुणे शाखेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारर्थींची नावे जाहीर करण्यात आली आहेत. हा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी (दि. 25 मे) 5.30 वाजता टिळक स्मारक मंदीर येथे होणार आहे. परिषदेच्या 40 व्या वर्धापन दिनी पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दीपक टिळक आणि ज्येष्ठ रंगकर्मी किर्ती शिलेदार आदी उपस्थित राहणार आहे.

“जल्लोष 2018′ या कार्यक्रमात नाट्य, नृत्य, विनोदी कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. यामध्ये विविध कलाकर सहभागी असणार आहेत.
पुरस्कारर्थीमध्ये उत्कृष्ट अभिनय (राज्यनाट्य स्पर्धा) जयदीप मुजुमदार, उत्कृष्ट दिग्दर्शक (राज्यनाट्य स्पर्धा) प्रियांका चांदेरे, उत्कृष्ट अभिनय स्त्री (राज्यनाट्य स्पर्धा) जान्हवी देशपांडे, नटवर्य केशवराव दाते पुरस्कार राघवेंद्र कडकोळ, मधुकर टिल्लु स्मृती एकपात्री कलाकार पुरस्कार दीलिप हल्ल्याळ, भार्गवराव आचरेकर स्मृती पुरस्कार मनोहर यादव, संगीत क्षेत्रातील माणिक वर्मा पुरस्कार वर्षा जोगळेकर, बबनराव गोखले पुरस्कार रजनी भट, सुनील तारे पुरस्कार मिलिंद दास्ताने, मधु कडु स्मृती लोकनाट्य पुरस्कार मोहन अडसूळ आणि गो. रा. जोशी स्मृती नाटक समीक्षक पुरस्कार विद्याधर कुलकर्णी यांना जाहिर झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)