मराठी चित्रपट महामंडळाच्या यंदाच्या सभेतही गोंधळच

कोल्हापूर – अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची त्रैवार्षिक सभेमध्ये आज गोंधळातच 7 ठराव करण्यात आले. कोल्हापुरातील शाहू सांस्कृतिक भवनामध्ये आयोजित सभेच्या सुरुवातीलाच अहवाल वेळेत न मिळल्यावरून काही काळ गोंधळ झाला. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक गटातील सभासदांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

शाहू सांस्कृतिक मंदिर येथे 2015-16, 2016-17 आणि 2017-18 या 3 वर्षांची ही संयुक्त सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीलाच अहवाल वेळेत न मिळल्यावरून काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांच्या वक्तव्यानंतर हा गोंधळ झाला. त्यानंतर पुन्हा सभा शांततेत सुरू झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आजच्या सभेत सात ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी अध्यक्ष मेघराजराजे भोसले, वर्षा उसगावकर, विजय पाटकर, सुशांत शेलार यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.

त्यानंतर माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर पुन्हा एकदा सत्ताधारी आणि संचालक मंडळ यांच्यात गोंधळ निर्माण झाला होता. अखेर या गोंधळातच चित्रपट महामंडळाची त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.

महामंडळाच्या भावी योजना  
साहित्य संमेलन आणि नाट्य संमेलनाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सहाय्याने चित्रपट संमेलन भरवणे. राज्य शासनाच्या कलावंत मानधन योजनेत चित्रपट कलावंत, तंत्रज्ञांची संख्या वाढविणे. त्यासाठी महामंडळासाठी स्वतंत्र कोटा देण्यात यावा ही मागणी करणे. ज्येष्ठ दिग्दर्शक मा. राजदत्त यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यात यावा ही मागणी राज्य सरकारकडे करणे आदी ठराव या बैठकीत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)