मराठी चित्रपट निर्मात्याची वितरकाकडून फसवणूक

 

पुणे,दि.3- मराठी चित्रपट निर्मात्याची एका वितरकाने 3 लाख 65 हजाराची फसवणूक केली आहे. चित्रपटासाठी राज्यभरात चित्रपटगृह उपलब्ध करुन देण्यासाठी पैसे घेण्यात आले होते. मात्र पैसे घेतल्यानंतर चित्रपटगृह उपलब्ध करुन न देता कार्यालय व घराला कुलूप लावून त्याने पळ काढला आहे.
ंयाप्रकरणी चित्रपट निर्माते शिवा बागुल यांनी फिर्यादी दिली आहे. तर सिक्‍स सेन्स फिक्‍स प्रॉडक्‍शनचे संतोष महाले यांच्याविरुद्द खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन 1981 असे चित्रपटाचे नाव असून, चित्रपटास नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये उकृष्ट ग्रामीण चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
फिर्यादी बागुल हे चित्रपट निर्माते असून त्यांनी त्यांचा चित्रपट सन 1981 हा प्रदर्शित करण्यासाठी संतोष महाले यांच्याबरोबर नोटराईज्ड करार केल होता. याची प्रोसेसिंग फी म्हणून 3 लाख 65 हजार रुपये त्यांना धनादेशाव्दारे देण्यात आले होते. चित्रपट जानेवारी महिण्यात प्रदर्शीत करण्याचे ठरवण्यात आले होते. यासाठी राज्यभरातील 80 चित्रपटगृहे उपलब्ध करुन देण्यात येणार होती. मात्र जानेवारी महिण्यात तो ठरल्याप्रमाणे प्रदर्शीत करण्यात आला नाही. यामुळे नव्याने 1 फेब्रुवारी ही तारीख ठरवण्यात आली . मात्र 1फेब्रुवारीलाही तो प्रदर्शीत करण्यात आला नाही. यानंतर बागुल यांचा कॉल आरोपी उचलत नव्हता. त्यांनी त्याचे कार्यालय गाठले असता, कार्यालयही कुलप बंद असल्याचे आढळले. यामुळे चित्रपट प्रदर्शीत होऊ शकला नाही तसचे बदनामीही झाली. याप्रकरणी प्रथम लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती, या तक्रार अर्जाची खातरजमा केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)