मराठी एकांकिका स्पर्धेत “पीसीसीओई’ची बाजी

पिंपरी – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने 19 वी राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात संपन्न झाली. यामध्ये राम गणेश गडकरी एकांकिका स्पर्धा करंडकमध्ये पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या “एन्ट्री एक्‍झिट’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला.

उत्कृष्ट अभिनय व दिग्दर्शक अथर्व ठाकरे, उत्कृष्ट संगीत विभाग व्दितीय क्रमांक वेदांत सेलमोकर, श्रध्दा टिल्लू, उत्कृष्ट नेपथ्य सुयश साळवेकर, अभिषेक बिल्दीकर यांनी चार वैयक्तिक बक्षिसे मिळवून “पीसीसीओई’च्या नावात मानाचा तुरा रोवला. तसेच महाविद्यालयीन नाट्य स्पर्धेत आकर्षण असणाऱ्या पुरुषोत्तम करंडक आणि फिरोदिया करंडक स्पर्धेत देखील “पीसीसीओई’च्या विद्यार्थ्यांनी दोन पारितोषिके मिळविली. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत 14 विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या “माझ्या छत्रीचा पाऊस’ या एकांकिकेने प्रेक्षकांवर वेगळा ठसा उमटविला.

-Ads-

मराठी राज्य नाट्य स्पर्धेत अथर्व ठाकरे याने पिंपरी-चिंचवड विभागातून अभिनयाचे प्रथम पारितोषिक पटकाविले. संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेत वेदांत सेलमोकर, चैतन्य शेंबेकर, चाणक्‍य तेंडुलकर, राहुल देसाई या विद्यार्थ्यांनी संगीत विभागात प्रथम क्रमांक मिळविला आणि शुभम अलई याला स्वलिखीत कविता “रेडिओ’वर सादर करण्याची संधी मिळाली. “पीसीसीओई’चे प्राचार्य डॉ. अ. म. फुलंबरकर यांनी आर्ट सर्कलचे मार्गदर्शक प्रा. अतुल पवार व या विद्यार्थ्यांचा गौरव केला. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, कोषाध्यक्ष शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक गिरीष देसाई, विद्यार्थी कल्याण विभागाच्या अधिष्ठाता डॉ. शितल भंडारी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)