“मराठीप्रेमी जनता सरकारला माफ करणार नाही’

पुणे- राज्य शासनाने मराठी भाषा सक्तीची करण्याचा कायदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात केला नाही तर, मराठीप्रेमी जनता सरकारला माफ करणार नाही, असे विधान लक्ष्मीकांत देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करण्यासंदर्भातील मागणी मी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून केली होती. त्याचा कायदा केला जावा, यासाठी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांची तीनदा भेट घेतली आहे. दोघांनीही यासंदर्भात कायदा करण्याचे आश्‍वासन दिले आहे. मात्र, अधिवेशनामध्ये हा प्रश्‍न आला असता तावडे यांनी दिलेले उत्तर अनाकलनीय आणि आपल्याच आश्‍वासनाला हरताळ फासणारे आहे, असे देशमुख म्हणाले.

-Ads-

दक्षिण राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील इंग्रजी आणि अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करावी, या मागणीसंदर्भात विधीमंडळात उत्तर देताना मराठीची सक्ती करता येणार नाही, असे सांगणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भूमिका मराठी हिताच्या विरोधी असल्याची टीका लक्ष्मीकांत देशमुख यांनी केली. ग्रामीण, गरीब विरुद्ध शहरी, श्रीमंत अशी महाराष्ट्राची फाळणी होण्याचा धोका उद्‌भवतो, असेही देशमुख म्हणाले. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. प्रमोद तलगेरी, हरि नरके, वसंत काळपांडे, मिलिंद जोशी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)