मराठीच्या लेखकांच्या उत्कर्षासाठी “गुगल’ होणार मार्गदर्शक

अशी करा नोंदणी
गुगलने पुण्यात आयोजित केलेल्या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी https://goo.gl/Fsbzuu या लिंकवर नोंदणी अर्ज उपलब्ध करण्यात आला आहे. निवड झालेल्या सदस्यांना ई-मेलद्वारे कार्यशाळेची माहिती कळवली जाणार आहे.

“गुगल सर्च संमेलन’ उपक्रम : 22 जून रोजी पुण्यात कार्यशाळेचे आयोजन

पुणे- मराठी साहित्याची वाढती मागणी लक्षात घेऊन “गुगल’ने मराठी साहित्यिक आणि लेखकांसाठी इंटरनेटच्या माध्यमातून एका अभिनव उपक्रमाची आखणी केली आहे. इंटरनेटमार्फत आपले साहित्य आणि पुस्तके पोहचवू पाहणाऱ्या लेखक आणि प्रकाशकांना “गुगल’ मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी “गुगल सर्च संमेलन’ या उपक्रमाची सुरूवात करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यासाठी 22 जून रोजी “गुगल’ने पुण्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मराठीसाठी आवश्‍यक “गुगल’च्या विविध फीचर्ससंदर्भात या कार्यशाळेत माहिती दिली जाईल.
या कार्यशाळेसाठी नावनोंदणी सुरू झाली असून, नोंदणीत दिलेल्या माहितीच्या आधारे कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सदस्यांची निवड गुगलची टीम करणार आहे.

“गुगल सर्च संमेलन’ उपक्रमांतर्गत हिंदीसह मराठी, तामिळ, तेलुगू आणि बंगाली या चार प्रादेशिक भाषांमधील लेखक, प्रकाशक, ब्लॉग लेखक, प्रादेशिक भाषांत वेबसाइटची निर्मिती करणारे डेव्हलपर; तसेच मराठीशी संबंधित व्यावसायिक यांच्याशी गुगल संवाद साधणार आहे. गुगलने उपलब्ध केलेल्या फीचर्सचा वापर कसा करावा, याबाबतसुद्धा मार्गदर्शन करण्यात येईल. मराठी भाषेमधील साहित्य इंटरनेटवरील वाचकांपर्यंत कशा पद्धतीने पोहचवायला हवे, यासाठी “गुगल’तर्फे सहकार्य करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)