मराठीच्या मोठ्या पडद्यावर होणार ‘फाईट’

बॉलीवूडप्रमाणे आता मराठी चित्रपटातही स्टंट आणि अॅक्शनची तुफान फटकेबाजी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. कारण, फ्युचर एक्स प्रोडक्शन निर्मित आगामी ‘फाईट’ या चित्रपटाद्वारे सिनेरसिकांना अॅक्शनपटाची जबरदस्त मेजवानी मिळणार आहे. लवकरच प्रदर्शित होत असलेला हा सिनेमा मराठीतील कौटुंबिक आणि प्रेमकथेसारख्या चाकोरीबद्ध सिनेमांहून अगदी वेगळा आहे. जिमी मोरे दिग्दर्शित ‘फाईट’ या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर पोस्टर लाँच करण्यात आला.

अॅक्शनचा जबरदस्त तडका असलेल्या या सिनेमाच्या टीझर पोस्टरवर एक नवा चेहरा आपल्याला पाहायला मिळतो. मराठी सिनेसृष्टीत दमदार पदार्पण करणाऱ्या या जिगरबाज तरुणाचे नाव जीत आहे. विशेष म्हणजे, छोट्या शहरातून आलेल्या या तरुणाने ‘फाईट’ सिनेमातील अॅक्शन सीनसाठी भरपूर मेहनत घेतली असल्याचे सिनेमाच्या टीझर पोस्टरमधून पाहायला मिळते. ‘फाईट’ या चित्रपटाचे ललित ओसवाल निर्माते आहेत. मराठीच्या मोठ्या पडद्यावरील ही ‘फाईट’ पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक असतील हे निश्चित!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)