मराठीचा झेंडा अटकेपार ! 2050 पर्यंत देशाला एक नव्हे तर जास्त मराठी पंतप्रधान- मुख्यमंत्री

नागपूर: 2050 पर्यंत देशाला एक नव्हे तर जास्त मराठी पंतप्रधान मिळतील, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केले आहे. जागतिक मराठी संमेलनाच्या कार्यक्रमात मराठी माणूस देशाचा पंतप्रधान कधी होणार, असा प्रश्न केला असता. मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले.

फडणवीस म्हणाले,  मराठीचा झेंडा अटकेपार लागण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे देशाच्या सर्वोच्चपदी एक नव्हे तर अधिक माणसे आपण निश्चितच पाहू. तसेच जेंव्हा समाजात परिणामकारक बदल करू शकू तेव्हा चांगला समाज घडेल.

आरक्षणाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आर्थिक आरक्षण हा अतिरिक्त विषय असू शकतो. मात्र आजही मागासलेपण अधिक आहे. त्यामुळे जात आहे व तोपर्यंत दाखलाही आहे. म्हणून मला असं वाटतं की याकरिता अजून थोडी वाट पाहावी लागेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)