मराठा समाजासाअठी ऐतिहासिक दिवस- खासदार संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर – समाजाच्या प्रत्येक घटकाने केलेल्या संघर्षाला, समाजासाठी म्हणून आजपर्यंत ज्या तरुणांनी बलिदान दिलं त्यांच्या त्यागाला एकप्रकारे न्याय मिळाल्याची भावना आज लोकांमध्ये आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकार, सर्वपक्षीय आमदार आणि नेत्यांचे सुद्धा अभिनंदन करतो.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी मराठ्यांना दिलेल्या आरक्षणाची पुनरावृत्ती होत असल्याचे आज दिसत आहे या बद्दल सरकारचे अभिनंदन करतो, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. मानसिक मनोबलाने निरुत्साही झालेल्या या समाजामध्ये नवप्रेरणा आणि सामाजिक एकी हळू हळू वाढत असलेली मी पाहात होतो.

2013 मध्ये मुंबई मध्ये धडकलेल्या महामोर्चाचे नेतृत्व करत असताना मला मराठा समाजाच्या भविष्याची चुणूक दिसत होती. त्याकाळच्या सरकारला त्यावेळी तात्काळ राणे समितीच्या माध्यमातून आरक्षण जाहीर करावं लागलं होतं. कायदेशीर बाबींच्या पूर्ततेची योग्य ती काळजी न घेता घाई गडबडीत घेतलेल्या त्या निर्णयाला न्यायालयात आव्हान मिळाले आणि दुर्दैवाने ते न्यायालयात टिकले नाही. असो, तो आता इतिहास आहे. त्यानंतर मराठा समाजाने मूकमोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्राला इतिहासात पहिल्यांदाच मराठा समाज एकत्र येऊ शकतो हे दाखवून दिलं.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर मराठा समाज हा कधीच एकवटला नव्हता. अगदी प्रांजळपणाने सांगतो, देशातल्या अनेक खासदारांनी माझ्याजवळ मराठा समाजाचे मनापासून कौतुक केलं होतं. एखादा समाज आपल्या न्याय्य हक्कासाठी लाखोंच्या संख्येने एकत्र येतो आणि तो सुद्धा इतक्‍या शांतपणे? हे यापूर्वी देशाने कधी पाहिलं नसेल. या मुक मोर्चातून एकप्रकारे समाजाने देशाला नवीन आदर्शच घालून दिला आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)