मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण : विधानसभेत एटीआर सादर 

मुंबई – मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी सेवेत आरक्षण देणारे मराठा आरक्षणाचा कृती अहवाल(एटीआर) आज विधिमंडळात सादर करण्यात आला आहे. या अहवालातून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळणार आहे. यासंबंधीचे विधेयक दुपारी मांडण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणावरचा कृती अहवाल आज विधानसभेत सादर करण्यात आला असून ओबीसीला धक्का लावण्यात आलेला नाही. विधानसभा आणि विधानपरिषदेत एकाच दिवशी विधेयक मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आरक्षण विधेयक मंजूर होण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेने आपल्या आमदारांना याआधीच व्हीप बजावला आहे. दरम्यान, धनगर आरक्षणासंदर्भातही लवकरच पावले उचलली जातील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

-Ads-

काय आहे अहवाल
– मराठा समाजास सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसइबीसी) म्हणून घोषित करण्यात येत आहे.
– अल्पसंख्याक शेक्षणिक संस्था वगळून अन्यदानीत आणि विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला आरक्षण.
– मराठा समाजातील उमेदवारांना राज्यातील लोकसेवांमधील नियुक्त्या व पदे यात आरक्षणाची तरतूद
– पंचायत, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांच्या जागांकरिता आरक्षण नसेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
100 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)