मराठा समाजाने आपल्या न्याय्य हक्कासाठी एकसंघ राहणे गरजेचे ः शिंदे

वडूज – महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग नव्याने तयार करून 16 टक्के आरक्षण जाहीर केले असून यापुढील काळात मराठा समाजाने आपल्या न्याय हक्कासाठी एकसंघ राहणे गरजेचे आहे असे मत खटाव तालुका समन्वयक बाबा शिंदे यांनी व्यक्त केले.

वडूज येथील सदिच्छा कार्यालय ऑफीस मध्ये झालेल्या खटाव तालुका मराठा समन्वयक बैठकीत ते बोलत होते . यावेळी समाजासाठी देत असलेल्या योगदानाबददल मराठा समन्वयक समिती व मराठा समाजाच्या वतीने समन्वयक बाबा शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खटाव तालुका सोशल फौऊडेशन अध्यक्ष अंकुश दबडे , संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष विजय शिंदे , विजय गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)