मराठा समाजाच्या वतीने कॅंडल मार्च

जुन्नर- राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्‍के आरक्षण जाहीर केले असून यानिमित्त जुन्नर शहरात शनिवारी (दि. 1) सकल मराठा समाजाच्या वतीने कॅंडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शासनाने दिलेल्या आरक्षणाचे स्वागत जल्लोषात न करता मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 42 समाज बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत निघालेल्या या मार्चमध्ये पंचक्रोशीतील मराठा बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात योग्य भूमिका घेवून ते कायदेशीर निकषांवर टिकवण्यासाठी शासनाने प्रामाणिक प्रयत्न करावेत, अशी भूमिका मराठा बांधवानी मांडत महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. याप्रसंगी संदेश बारवे, खंडेराव ढोबळे, दिपक वाळूंज, रमेश हांडे, विकी पारखे, शिवम घोलप आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)