मराठा समाजाच्या मुलांना शिक्षण, नोकरीत लाभ होईल

उरूळी कांचन परिसरात प्रतिक्रिया

उरुळी कांचन- मराठा समाजाला 16 टक्‍के आरक्षण मिळाल्यामुळे मराठा समाजातील मुलांना शिक्षणात व नोकरीत त्याचा फायदा होईल, असे मत डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र कांचन व रामदास चौधरी यांनी व्यक्‍त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेतृत्वाखाली सरकारने मराठा आरक्षणाचा दिलेला शब्द खरा करुन दाखविला, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या वतीने सारिका लोणारी यांनी व्यक्‍त केली. शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारी नोकरी मिळत नव्हती. तसेच उच्च शिक्षण घेण्यासाठी चांगले गुण असूनही उच्च शिक्षण घेता येत नव्हते. शेवटी मुलांना शेतात काम करावी लागत होती. शेतजमीन कमी असल्याने लहान, मोठे व्यवसाय करावे लागत होते. मराठा समाजाला गरिबीचे चटके सहन करावे लागत होते. उशीर झाला तरी मराठा समाजाला न्याय मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे हवेली तालुका विभागप्रमुख स्वप्नील कुंजीर व छाया महाडिक यांनी दिली. समाजाच्या प्रत्येक घटकाने केलेल्या संघर्षाला समाजासाठी म्हणून आजपर्यंत ज्या तरुणांनी बलिदान दिले. त्यांच्या त्यागाला एकप्रकारे न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया हवेली तालुका महानुभाव परिषेदेचे अध्यक्ष नंदकुमार मुरकुटे यांनी दिली. मराठा समाजाने मूक मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्राला इतिहासात पहिल्यांदा मराठा समाज एकत्र येऊ शकतो, हे दाखवून दिले. इतक्‍या मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा कधीच एकवटला नव्हता, अशी प्रतिक्रिया निखील गोते यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)