मराठा समाजाच्या मागण्यांवर शासन सकारात्मक – फडणवीस

मुंबई – मराठा समाजाच्या सर्वच मागण्यांवर शासन सकारात्मक असून विविध निर्णयांची अंमलबजावणी होत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी तसेच मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन करण्यासाठी काकासाहेब पंडीत मात्रे-पाटील या तरुणाने औरंगाबाद ते मुंबई अशी पदयात्रा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येथील सह्याद्री राज्य अतिथीगृहात आज भेट घेऊन काकासाहेब यांनी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले.

बाळापूर (ता. जि. औरंगाबाद) येथील काकासाहेब पंडीत मात्रे-पाटील यांनी 1 सप्टेंबरपासून औरंगाबाद येथील क्रांती चौकातून पायी प्रवास सुरु केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काकासाहेब यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर सर्वच मागण्यांवर शासन सकारात्मक आहे. विविध निर्णयांची अंमलबजावणीही सुरु झाली आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना काकासाहेब म्हणाले, मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मराठा समाजाच्या मागण्या निश्‍चित पूर्ण होऊ शकतील. त्यामुळे मराठा तरुणांनी नैराश्‍य न बाळगता वाटचाल करावी.

आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. यामुळे कुटुंबाचे मोठे नुकसान होते. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलाल तर जेव्हा आरक्षण लागू होईल तेव्हा त्याचा उपयोग कोणाला होणार, असे भावनिक उद्‌गार काकासाहेब यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)