मराठा समाजाची ऐक्‍याची वज्रमूठ भक्कम

संग्रहित छायाचित्र

नऊ तारखेच्या आंदोलनासाठी मतभेद विसरून एकत्र
अकोले – मराठा क्रांती मोर्चाला अनुसरून नऊ ऑगस्टच्या आंदोलनाची पूर्वतयारी करण्यासाठी आलेल्या सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी आपले पक्षीय झेंडे व संघटनात्मक मत, मतांतरे बाजूला ठेवले. नऊ तारखेचा “अकोले बंद’ यशस्वी करण्यासाठी ऐक्‍याची वज्रमूठ अधिक सकस बनवण्याची प्रतिज्ञा या वेळी करण्यात आली. अकोले येथील शासकीय विश्रामगृहावर मराठा समाजाची दुपारी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव होते. या बैठकीचे निमंत्रक डॉ संदीप कडलग, मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष लालूशेठ दळवी, माकपचे डॉ. अजित नवले, भाकपचे वकील शांताराम वाळुंज, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, मराठा सेवा संघाचे दिलीप शेणकर, संभाजी ब्रिगेडचे दिलीप शेणकर, सोमनाथ नवले, शेतकरी संघटनेचे शरद देशमुख, अशोक आरोटे, सुभाष येवले,कॉंग्रेसचे विकास वाकचौरे, इतर मागासवर्गीय संघटनेचे तालुकाध्यक्ष किरण चौधरी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
येत्या नऊ तारखेला गाव पातळीवर गाव बंद आंदोलन छेडले जावे व अकोले या तालुक्‍याच्या ठिकाणी सर्व मराठा बांधवानी यावे. शिवाय सर्व दिवस अकोले बंद पाळला जाईल, यासाठी शहराशी संपर्क साधण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. विशेष बाब म्हणजे आर्थिक बाबीवर केवळ वल्गना झाल्या नाही, तर सर्व नेत्यांनी पक्ष व संघटना पातळीवर आपली मदत राहील, असे जाहीर करून उपस्थित नेत्यांनी मदतीसाठी आपला खिसा रिता केला. या वेळी डॉ. कडलग यांनी आपले आंदोलन अहिंसेच्या मार्गाने जाईल असे स्पष्ट केले. जाधव, डॉ. नवले, दळवी, शेणकर, वाकचौरे, रोहिदास धुमाळ, सचिन शेटे, सागर वाकचौरे, शांताराम वाळुंज, येल्हुबा नवले, प्रा.विकास नवले, माधव तिटमे,आदींनी विविध सूचना केल्या. ओबीसी सेलचे किरण चौधरी यांनी आपली आर्थिक मदत देवून मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला. डॉ मनोज मोरे, नितीन नाईकवाडी,बाबासाहेब नाईकवाडी, सोमनाथ नवले, आर. डी. चौधरी, सूर्यभान सहाणे आदींनी झालेल्या चर्चेत भाग घेतला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)