मराठा संवाद यात्रेस प्रारंभ

बारामती- राज्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या हिंसाचाराच्या घटना थांबून समाजात सलोखा नांदावा यासाठी आज (रविवार) पासून बारामतीतून मराठा संवाद यात्रेस प्रारंभ झाला. प्रशांत सातव यांनी मराठा संवाद यात्रेचे आयोजन केले असून बारामतीतून निघून क्रांतीदिनी (दि. 9) मुंबईला आझाद मैदानात या यात्रेचा समारोप होणार आहे. सासवड, पिंपरी चिंचवड व नवी मुंबई येथे या यात्रेचा मुक्काम होणार आहे. या यात्रेदरम्यान माहिती पत्रकाचे वाटप होणार असून आरक्षण मोहिमेत शहिद झालेल्यांना आदरांजली अर्पण केली जाणार आहे. दरम्यान, आज बारामतीत शिवाजी उद्यानामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन या संवाद यात्रेचा प्रारंभ झाला. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसीलदार हनुमंत पाटील, अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्‍वस्त सुनंदा पवार, माळेगावचे अध्यक्ष रंजन तावरे, माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विशेष तयार करण्यात आलेली प्रतिज्ञा सर्वांनी सामूहिकपणे घेतली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)