मराठा संवाद यात्रेचे पिंपरीत स्वागत

पिंपरी : बारामतीहून मुंबईकडे निघालेल्या मराठा संवाद यात्रेतील तरुणांशी पक्षनेते एकनाथ पवार यांनी पिंपरीत संवाद साधला.

पिंपरी – मराठा समाजाच्या न्याय्य व हक्कांच्या मागणीचा पाठपुरावा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून समाजबांधव करीत आहेत. मराठा समाजाला शाश्‍वत आरक्षण सर्व न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार देणार आहे. परंतू मराठा तरुणांनी, तरुणींनी भावनेच्या भरात आत्मघाताचे पाऊल उचलू नये. त्यातून प्रश्न सुटण्याऐवजी कुटूंबियांना व समाजबांधवांना दु:ख होणार आहे असे पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.
सामाजिक संदर्भ, ताणलेले जातीय संबंध, दीर्घकालीन सामाजिक व सांस्कृतिक परिणामातून समाजबांधवांचे वैचारिक व प्रबोधन करण्यासाठी बारामतीचे प्रशांत सातव यांच्या नेतृत्वाखाली पाच ऑगस्ट पासून बारामती ते मुंबईला निघालेल्या मराठा संवाद यात्रेचे पिंपरी चिंचवड मध्ये पक्षनेते एकनाथ पवार यांनी स्वागत केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी राज्यभर विविध आंदोलने सुरु आहे. अनेक तरुण, तरुणींना यासाठी आत्मबलीदान केले. सामाजिक संदर्भ, ताणलेले जातीय संदर्भ, असंतोषाने पेटून भावनिक झालेली समाजाबांधव, आत्मघात करु पाहणारा समाजबांधव, कायदा हातात घेऊ पाहणारे युवक यांच्याशी संवाद साधून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी प्रशासन व सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी मराठा संवाद यात्रा काढण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या संवाद यात्रेचे भक्ती शक्ती चौकात नगरसेवक तुषार हिंगे, जांबे गावचे सरपंच अंकुश गायकवाड, संदिप ताथवडे, मच्छिंद्र शिंदे, प्रमोद ससार, दत्तात्रय पवार, सचिन पाटील, कुमार ससार, प्रविण घरत यांनी स्वागत केले. या संवाद यात्रेत समाज प्रबोधन व मराठा आरक्षण चळवळी विषयी जनजागृती करणारी माहिती पत्रके वाटून समाजबांधवांशी संवाद साधण्यात येत आहे. या संवाद यात्रेचा समारोप क्रांतीदिन नऊ ऑगस्ट रोजी मुंबईत आझाद मैदानावर होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)