मराठा व धनगर समाजाला भाजपाच आरक्षण देणारः ना. चंद्रकांत पाटील

 

म्हसवड
देशातील सर्व सामान्य जनतेला सुख, समृध्दी व सुरक्षा देणारे भाजपाचे सरकार सत्तेत आहे. मागील चार वर्षात महाराष्ट्रातील जनतेला दिलेल्या वचनांची पुर्तता या सरकारने केली आहे. मराठा व धनगर या समाजाला हेच भाजपाचे सरकार नक्कीच आरक्षण देणार, आसा विश्‍वास राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. म्हसवड येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
माण तालुक्‍यातील विविध विकास योजनांचे उद्‌घाटन व माण नदीत जिहे-कटापूर योजनेतून सोडलेल्या पाण्याचे पूजनाच्या कार्यक्रमात ना.पाटील बोलत होते.
यावेळी पशू संवर्धन व दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर, सहकार परीषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, म्हडाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी आमदार दिलीप येळगावकर, जिल्हा बॅंकेचे सदस्य अनिल देसाई आदी मान्यवर उपस्थीत होते.
यावेळी ना. पाटील पुढे म्हणाले, पश्‍चिम महाराष्ट्रातील कॉंग्रेसचा गड उध्वस्त करण्यासाठी आलो आहे. चाळीस वर्षे कॉंग्रेस जनतेला फसविले. त्या मूळे जनतेने त्यांना दूर केले. यापुढेही जनता त्यांना कधिच सत्तेत येऊ देणार नाही.चार वर्षात भाजपाने जनतेला सुख, सुरक्षितता दिली आहे. अनेक हिताच्या योजना आणल्या. हा फरक चार वर्षात जनतेने अनुभवला आहे.
पाणी योजना पूर्ण करण्यासाठी जादा निधी तरतूद केली आहे. माण मधील गावांना टेंभु योजनेचे पाणी पिण्यासाठी मिळत नव्हते. पिण्याच्या पाण्यासाठी विशेष तरतूद केली. टंचाई निधीतून ही योजना पूर्ण केली आहे. अपूर्ण योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. भारतातील जनतेला सुखी , आनंदी करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील अपूर्ण धरणे पूर्ण करण्यासाठी 14 हजार कोटी रुपयाची तरतुद केली आहे. घरातील स्वंयपाक गॅसचे मोफत वाटप कले आहेत. गरोदर महिलेस पाच हजार रुपये मदत दिली जाते. पिक विमा योजना आणली. पाच लाखा पर्यंत औषधोपचार खर्च शासन देत आहे. महाराष्ट्र सरकारने 34 हजार कोटी कर्ज माफी दिली आहे. पायाभुत सुविधा दिल्या आहेत. मूख्यमंत्र्यांचे सहाकार्याने पाणी प्रश्न सोडविणे शक्‍य झाले असेही ना.पाटील यांनी यावेळी सांगीतले. मराठा व धनगर या समाजाल निश्‍चित आरक्षण मिळेल. अन्‌ हेच सरकार देईल असा विश्‍वास व्यक्त करून शासनाने एक वर्षात 32 हजार किमी रस्ते केले आहेत असे ही सांगीतले. ते पुढे म्हणाले, आता सुप्रियाताई फोटो कुठे काढणार. तो चान्स त्यांना मिळणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी ना. महादेव जानकर म्हणाले, सामान्य जनतेला फक्त भाजपाच न्याय देऊ शकते हा माझा अनुभव आहे. यापुढील नीवडणुकीत जनतेने भाजपा व रासपाच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. धनगर समाजाला भाजपा आरक्षण देणार याची मला खात्री आहे असे ही ते म्हणाले.

-Ads-

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई म्हणाले, माण-खटाव या दुष्काळी तालुक्‍यांना पाणी देणारे ना. चंद्रकांतदादा पाटिल हेच खरे भगीरथ आहेत. माण-खटाव साठी टंचाई निधीतून
9 कोटी 75 लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. साठ वर्षे या पश्‍चिम महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी प्रत्येक निवडणुकित फक्त पाण्याची आश्वासने देऊन निवडणुका जिंकल्या, पण प्रत्यक्ष भाजपानेच या दुष्काळी तालुक्‍याला पाणी दीले आहे. माणच्या उत्तर भागालाही पाणी मिळावी अशी मागणीही देसाई यांनी केली व ते पुढे म्हणाले, आगामी काळात जनता हे ऋण कधीच विसरणार नाही.

भाजपाचा आमदार झाला तर माण चा विकास पूर्ण होईल.
महायूती चे 151 आमदार निवडून आणण्याचा पण ना. चंद्रकांत पाटील यांनी केला आहे 151 वा आमदार हा माणचाच असेल.
भाजपाकडेच जनतेचा ओढा असून . भाजपाने माधव फैक्‍टर राबवावा असे मत डॉ.दिलीप येळगावकर यांनी व्यक्त केले. वंजारी, धनगर,मराठा हा फैक्‍टर निवडणुकीत महत्वाचा ठरेल, तो फॅक्‍टर येथे राबवावा असे ही डॉ. येळगावकर म्हणाले, माण-खटावला पाणी मिळावे यासाठी मी वीस वर्षे लढा दिला . या लढ्याला यश मिळाले. पण शेवटच्या टोकला पाणी मिळे पर्यंत माझा संघर्ष सूरु राहील. आता माण-खटावमध्ये भाजपाचा आमदार निवडून आणण्याठी रासपाने सहकार्य करावे असे अवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात आभार विश्वभंर बाबर यांनी आभार मानले. यावेळी बाळासाहेब मासाळ, विजय साखरे, बाळ खाडे, सौ. सुवर्णा देसाई, उज्वल काळे,संदीप भोसले, भाजपा शहराध्यक्ष अरविंद पिसे,
अविनाश मासाळ, विजय टाकणे, डॉ. महादेव कापसे आदींसह म्हसवड व परिसरातील बहुसंख्य शेतकरी व नागरिक उपस्थित होते

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)