मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणी सुरू

महसूलमंत्री पाटील : समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न

पुणे – “मराठा समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शासन प्रयत्न करत आहे. एकही विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मोफत वसतिगृहांची निर्मिती करण्यात येत आहे. मराठा समाजासाठी सर्व योजनांची अंमलबजावणी करून शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहचवणार आहे,’ असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये वसतिगृह उभारण्यात आले आहे. या वसतिगृहाचे उद्‌घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, आमदार विजय काळे, राजेंद्र कोंढरे आदी उपस्थित होते.

महसूलमंत्री म्हणाले, “पुण्यासारख्या शहरात मुलाला शिक्षणासाठी ठेवण्यामध्ये पालकांची मोठी ओढाताण होते. त्यांच्यासाठी ही वसतीगृहे वरदान ठरणार आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह हे विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत असल्यामुळे त्यांची खूप मोठी मदत मराठा समाजातील मुलांना होणार आहे. मराठा समाजाने शासनाकडे अनेक मागण्या नोंदवल्या होत्या. त्यापैकी काही मागण्या तातडीने पूर्ण करण्यात येत आहेत. उर्वरित मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत.केवळ आरक्षणापर्यंत न थांबता शासनाने लागू केलेल्या अनेक योजनांचा फायदा नागरिकांनी घ्यावा. आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळामार्फत कर्जाची सोय करून अनेक नवउद्योजक बनवण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न केले जात आहेत.’

पालकमंत्री बापट म्हणाले, “या कार्यक्रमाने एका चांगल्या गोष्टीची सुरूवात झाली आहे. मराठा समाजाच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. वसतीगृहामध्ये ग्रंथालय, व्यायामशाळा सुरु करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील.’

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग, अधीक्षक अभियंता राजेंद्र रहाणे यांच्यासह वरीष्ठ अधिकारी, सामान्य नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)