‘मराठा लाइट इंन्फन्ट्री’ भरती प्रक्रिया सुरू

पुण्यात सात ते नऊ जानेवारी होणार


इच्छुकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

पुणे – लष्कराच्या “मराठा लाइट इंन्फन्ट्री’ या प्रादेशिक सेनेमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली असून, सात ते नऊ जानेवारी दरम्यान पुण्यातही भरती प्रक्रिया होणार आहे. यासाठी वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे असणार असून, किमान शैक्षणिक पात्रता 10 वी ते 12 वी अशी आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी रेसकोर्स जवळील लष्कराच्या जनरल परेड ग्राऊंड येथे उपस्थित राहावे, असे आवाहन लष्कर प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

लष्कराच्या प्रादेशिक सेनेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. यामध्ये जवान, शिपाई, लिपिक आणि ट्रेडमन या पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे.

यामध्ये शिपाई (सामान्य ड्युटी) यासाठी उमेदवाराची शैक्षणिक योग्यता 45 टक्‍के गुणांसह 10 वी पास अथवा 12 वी पास तसेच प्रत्येक विषयात कमीत कमी 33 टक्‍के गुण असावे. तर, लिपिक पदासाठी कमीत कमी 60 टक्‍के गुणांसह 12 वी पास तसेच प्रत्येक विषयात कमीत कमी 50 गुण असावेत. (इंग्रजी व गणित विषय अनिवार्य) तसेच संगणक आणि टंकलेखन केले असल्यास प्राधान्य दिले जाईल. ट्रेडमन या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कमीत कमी 10 वी पास असावा.

7 जानेवारी रोजी पुण्यातील रेसकोर्स येथील जनरेल परेड ग्राऊंड येथे उमेदवारांची शारीरिक परीक्षण केले जाईल. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, दादर आणि नगर हवेली, दिव आणि दमण आणि लक्षद्वीप येथील तरूण सहभागी होऊ शकतात, अशी माहिती लष्करातर्फे अधिकृत पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

उमेदवारांसाठी आवश्‍यक शारीरिक क्षमता
ऊंची – कमीत कमी 160 सें.मी.
वजन – कमीत कमी 50 किलो
छाती – कमीत कमी 77 सें.मी. 05 सें.मी. फुगवुन


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
22 :thumbsup:
6 :heart:
2 :joy:
2 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)