मराठा, मुस्लीम, धनगर कृती समितीचा निश्‍चय

आरक्षण न दिल्यास थेट  सरकारला धडा शिकविणार

पुणे – राजकीय इच्छाशक्‍तीच्या अभावामुळेच मराठा, मुस्लीम आणि धनगर समाजांची अवस्था बिकट आहे. त्यामुळे आरक्षणाची मागणी करत असलेल्या तिन्ही समाजांचे येणाऱ्या काळात संघटन करून सरकारला धडा शिकविण्याचा निश्‍चय मराठा, मुस्लीम, धनगर कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे.

मराठा, मुस्लीम आणि धनगर समाजांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. याला तिन्ही समाजांचे प्रत्येकी पाच प्रतिनिधी बोलविण्यात आले होते. समितीचे नेतृत्त्व ऍड. रवींद्र रणसिंग यांच्याकडे सोपविण्यात आले असून यावेळी मराठा समाजाचे अभय भोर, रवींद्र देशमुख, ऍड. प्रसाद भरगुडे, दशहारी चव्हाण, अक्षय काटे, दिंगबर मांडवगणे, मुस्लीम समाजाचे मकबूल तांबोळी, सलीम पटेकरी, सामाजिक कार्यकर्त्या शबाना सी. समीना शेख, परवीन शेख उपस्थित होत्या. तर धनगर समाजाचे गणपत देवकाते, हर्षद देवकाते, पोपट कोकरे उपस्थित होते.

बैठकीत राज्यभर संघटन निर्माण करून जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात धार्मिक, जातीय, आणि प्रांतिक वाद घालून दुफळी निर्माण करण्यात येत आहे. मात्र यापुढे द्वेष बाजूला सारून सर्वांना एकत्र घेऊन लढा देण्याचे समितीच्या प्रतिनिधींनी बैठकीत निश्‍चित केले आहे.

या राज्यकर्त्यांवर जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठा दबावगट कार्यरत असणे आवश्‍यक आहे. त्यासाठी या कृती समिती स्थापन केल्याचे अध्यक्ष रवींद्र रणसिंग यांनी सांगितले. यावेळी मकबूल तांबोळी यांनी आगामी काळात संघटन करण्यावर भर देण्यासाठी आपले विचार मांडले. तर धनगर समाजाचे गणपत देवकाते यांनी विभागानुसार काम करण्याची गरज व्यक्त केली. तसेच अभय भोर यांनी तिन्ही समाजांच्या बेरोजगार तरुणांना व्यावसाय सुरू करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)