मराठा भाडेवाल्यांची धर्मशाळातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी नायब तहसिलदारांना निवेदन

पुणे- मराठा भाडेवाल्यांची धर्मशाळातर्फे गुरूवारी क्रांतीदिनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मामलेदार कचेरी येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पुणे, हवेलीचे नायब तहसिलदार समीर यादव यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व पुणे लॉयर्स सोसायटीचे चेअरमन ऍड. यशवंत ऊर्फ बाळासाहेब खराडे यांनी केले. त्यावेळी संजय जाधव, ज्ञानदेव कोलते, संजय साळुंखे, संजय सणस, राजेंद्र मोरे, सचिन शिंदे, राजेंद्र खराडे, सुर्यकांत टेकवडे, शिवनाथ दळवी, सुनील गायकवाड, अविनाश सणस, अक्षय नलावडे, रोहन कातुरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनात आरक्षण मागणीच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर मराठा आंदोलनात हुतात्म आलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)