मराठा नेत्यांनीच मराठा आंदोलनाला केले बदनाम

विनोद तावडे यांचा आरोप

मुंबई – मराठा समाज आणि बहुजन समाजामध्ये फूट पाडण्याचा राज्य सरकारचा डाव असल्याचा राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या आरोपाला मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य विनोद तावडे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मराठा नेत्यांनीच मराठा समाजाचे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. समाजात दुही माजविण्यासाठी काही मराठा नेत्यांनीच हिंसा घडवून आणली असल्याचा आरोप तावडे यांनी केला. मंत्रालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विनोद तावडे बोलत होते.

-Ads-

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर हिंसक आंदोलने मराठा क्रांती मोर्चाकडून केली जात नसून त्यात बाहेरील समाज कंटकांचा हात असल्याचे पुरावे हाती आल्याचे औंरंगाबादचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिलेली माहिती खरी आहे का, असा सवाल पत्रकारांनी केला असता तावडे म्हणाले, मराठा मोर्चाच्या शांतीपूर्ण आंदोलनाला प्रतिसाद देत फडणवीस सरकारने समाजाच्या बहुतांश मागण्या पूर्ण केल्या आहेत. मतांचे राजकारण न करता हे सरकार आता न्यायालयातही कायद्यासमोर टिकेल असे आरक्षण देत असल्याची खात्री झाली आहे.

मराठा समाजाला न्यायालयाचा निकाल येईल तेव्हा हे सरकार समाजाच्या आरक्षणाची मागणी न्यायपूर्वक सोडवणारे प्रामाणिक सरकार असल्याचे दिसून येईल. मराठा समाजाचे जे नेते होते ते अनेक वर्ष मराठा समाजाचे भले करु शकले नाही. आता शांतीपूर्ण मार्गाने या समाजाला फडणवीस सरकार न्याय देत असल्याचे त्यांना पहावत नाही. त्यामुळे या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी काही मराठा नेत्यांनी अशा हिंसक कारवाया केल्याचे समोर येत आहे, असे तावडे म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)