मराठा, धनगर, मुस्लीम समाजाचा मोर्चा 

आरक्षणाची मागणी; सरकारकडून झुलविल्याची गडाखांची टीका
नेवासे फाटा- आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी शुक्रवारी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने नेवासे तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला पाठींबा देत आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लीम व धनगर समाजाही त्यात सहभागी झाला. आरक्षणासाठी सरकारने समाजाला झुलवीत ठेवले, म्हणून आज समाज रस्त्यावर आला आहे. काही पुढाऱ्यांना हाताशी धरून समाजा-समाजांत भांडणे लावण्याचा सरकारने प्रयत्न केला असल्याचा आरोप माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केला.

नेवासे येथील इज्तेमा मैदानापासून मोर्चास प्रारंभ झाला. छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेल्या भगव्या झेंड्यासह, हिरवे व पिवळे झेंडे मोर्चामध्ये दिसत होते. आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, येळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणा या वेळी तिन्हीही समाजाकडून मोर्चामध्ये देण्यात आल्या. सकल मराठा समाज बांधवांसह मुस्लीम, धनगर तसेच इतर समाजातील बांधव ही आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मोर्चाच्या अग्रभागी युवती तर त्यामागे युवक, मराठा, धनगर, मुस्लीम समाज बांधव सहभागी झाले होते. नेवासे शहरातील एसटी स्थानत, नगर चौक, खोलेश्वर गणपती मंदिर चौक, श्रीरामपूर रस्ता मार्गे दुपारी 12 वाजता मोर्चा नेवासे तहसील कार्यालयावर गेला. या वेळी मराठा आरक्षणासाठी हुतात्मा झालेले काकासाहेब शिंदे, जगन्नाथ सोनवणे, प्रल्हाद कल्याणकर, अभिजीत देशमुख, रोहन तोडकर,प्रमोद होरे पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माजी गडाख म्हणाले, की आरक्षणाच्या प्रश्नांवर पुढाऱ्यांना हाताशी धरून समाजामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न सरकारने केला. चार वर्षांच्या कालावधीत सरकारला आरक्षणाच्या मुद्यावर सहकार्य ही केले; मात्र आरक्षणाच्या प्रश्नांसाठी सरकारकडून समाजाला झुलवत ठेवण्याचे काम झाले. आरक्षणासाठी सत्तेला लाथ मारण्याची तयारी ठेवा. आरक्षणाच्या प्रश्नांसाठी येणाऱ्या काळात एकीचे बळ दाखवा.

या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे म्हणाले, की या मोर्चात मराठा बांधवांना पाठिंबा देऊन आपल्या आरक्षणासाठी मुस्लीम व धनगर समाज बांधव ही सहभागी झाले. या मोर्चाने राज्याला वेगळी दिशा मिळाली. सरकारला धडा शिकविण्यासाठी पक्ष जात भेद विसरून एकत्र या. सरकारची पायउतार होण्याची वेळ आली आहे. आरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. आता मराठा समाज पेटून उठला आहे.

भाऊसाहेब वाघ यांनी प्रास्ताविक केले. या वेळी “त्रिमूर्ती’च्या अध्यक्ष सुमतीताई घाडगे पाटील, स्वप्नांक्षा डिके, राणीताई दरंदले, गफूरभाई बागवान, ऋषिराज टकले, ऍड. सादिक शिलेदार, अशोक कोळेकर, सृष्टी ताके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महंमदभाई आतार,अशोक गायकवाड, वकील संघटनेचे अध्यक्ष गोकुळ भताने यांनी आरक्षणाबाबत सरकारच्या नाकर्त्याच्या कडाडून टीका केली. ऍड. वसंतराव नवले यांनी वकील संघाच्या वतीने, तर मातंग समाजाच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप सरोदे यांनी या आरक्षण मोर्चाला पाठिंबा जाहीर केला.

या मोर्चामध्ये त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील, भैय्यासाहेब देशमुख, काशिनाथ नवले, गणेश गव्हाणे, संभाजी माळवदे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील,शेतकरी नेते पी.आर. जाधव, ऍड. के. एच. वाखुरे, मौलाना जाकिरभाई शेख, हारूणभाई जहागीरदार, सुलेमान मणियार, संदीप बेहळे, असिफभाई पठाण आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)