मराठा-धनगर-मुस्लीम समाजाच्या आरक्षणासाठी ठिय्या

अनिल ताके : आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार
नेवासेफाटा- मराठा धनगर व मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी नेवासा शहरात आजपासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. आरक्षण मिळेपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा अनिल ताके यांनी दिला.
मराठा, धनगर व मुस्लीम समाजाला आरक्षण प्रश्‍नावर शुक्रवारी समाज बांधवांनी नेवासे तहसील कचेरीवर भव्य मोर्चा काढल्यानंतर आजपासून शहरातील श्रीरामपूर रोडवर असलेल्या खोलेश्वर गणपती चौकात बेमुदत ठिय्या आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. हे ठिय्या आंदोलन बेमुदत असल्याचे सकल मराठा समाजाचे ताके यांनी सांगितले.
आज सकाळी 11 वाजता सुरू करण्यात आलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनामध्ये अनिल ताके, भाऊसाहेब वाघ, संभाजी माळवदे, दीपक धनगे, बाळासाहेब कोकणे, अशोक कोळेकर, युसूप बागवान, राजेंद्र उंदरे, अभिजित मापारी, संदीप गाडेकर, देविदास जगताप, गणेश कोरेकर, विशाल सुरडे, असिफ पठाण, कल्पेश बोरकर हे मुख्य आंदोलक असून, त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरसेवक काकासाहेब गायके, जितेंद्र कुऱ्हे, संदीप बेहळे, अंबादास इरले, फारुकभाई आतार, पोपटराव जिरे, जानकीराम डौले, किशोर ठाणगे, नामदेवराव खंडागळे, शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब पवार, गणेश झगरे, नारायण लोखंडे, धनंजय डिके, कानिफराजे डिके, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संजीव शिंदे यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. श्रीरामपूर रोडवर खोलेश्‍वर मंदिराजवळ ठिय्या आंदोलन ठिकाणी आंदोलक हे देशभक्‍ती गीते गाऊन तसेच सकल मराठा समाजासह धनगर, मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून घोषणा देत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)