मराठा क्रांती मोर्चाच्या 9 प्रमुख कार्यकर्त्यांची धरपकड

पुणे – मराठा क्रांती मोर्चाकडून सोमवारी विधिमंडळावर मराठा संवाद यात्रेच्या माध्यमातून मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुणे पोलिसांनी प्रमुख कार्यकर्त्यांची मध्यरात्रीपासूनच धरपकड केली. यामध्ये प्रमुख अकरा जणांना ताब्यात घेतले. मात्र, त्यातील दोघे मुंबईला जाणार नसल्याने त्यांना सोडून देण्यात आले. तर इतर नऊ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन सायंकाळी सोडण्यात आले.

मराठा समाजाच्या आरक्षणासह प्रलंबित 20 मागण्यांसाठी मराठा संवाद यात्रेचे राज्यभर आयोजन करण्यात आले होते. सोमवारी विधिमंडळावर संवाद यात्रा धडकली. त्यानंतर तेथे आंदोलन करण्यात आले. यासाठी रविवारी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईकडे निघाले होते. तर दुसरीकडे मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या (26/11) स्मृतिदिनानिमित्त मुंबईत कडक बंदोबस्त होता. यातच मोर्चा येणार असूल्याने पोलिसांसाठी हे मोठे आव्हान होते. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरात मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. त्यात पुण्यातील अकरा कार्याकर्त्यांच्या घरासमोर मध्यरात्रीपासून पोलिसांना तैनात करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी सकाळी सर्वांना ताब्यात घेतले.

शहरभरात सहकारनगर, हडपसर, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून या कार्यकर्त्यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांना सहकारनगर, अमर पवार यांना भरती विद्यापीठ पोलिसांनी, शुभम मोरे, स्वप्निल गव्हाणे, चेतन शिंदे, प्रसाद म्हस्के, यांना हडपसर पोलिसांनी, विलास ढमाले, सचिन पासलकर यांना बिबवेवाडी पोलिसांनी, तर सिंहगड रोड पोलिसांनी अश्‍विनी खाडे पाटील यांना ताब्यात घेतले. तर प्रवीण गायकवाड यांना त्यांच्या सहकाऱ्यासोबत ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, ते मुंबईला जाणार नसल्यामुळे त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्यानंतर सोडून देण्यात आले.

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून मुंबईल पोलीस कायदा कलम 68 नुसार मराठा क्रांती मोर्चाच्या नऊ जणांस ताब्यात घेतले आहे. त्यांना सायंकाळी सोडून देण्यात आले.
– अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)