मराठा क्रांती मोर्चाचे फलटणमध्ये ठिय्या आंदोलन

फलटण, दि. 1 (प्रतिनिधी) – राज्यभरात गेल्या सात दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आंदोलन सुरु आहे. आंदोलनाच्या सातव्या दिशी फलटणमध्ये या आंदोलनाला व्यापक स्वरुप आले आहे. मंगळवारी ठिय्या आंदोलनासाठी फलटण तालुक्‍यातील ग्रामीण भागातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मराठा आरक्षणासाठी गेली सात दिवस सुरू असलेले ठिय्या आंदोलन सरकारच्या चालढकलीपणामुळे सध्या मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. गेल्या सात दिवसात अनेक मार्गाने आंदोलकांनी शासनाचा निषेध केला आहे. आगामी काळात मराठा आंदोलक कोणती भूमिका घेणार? यावर सरकार व प्रशासन यांचे लक्ष लागून राहिले आहे.
मराठा आरक्षणाबाबत शासनाने त्वरीत निर्णय घेवून मराठा तरुण मुलामुलींना नोकरीत व शिक्षणात आरक्षण दिले पाहिजे. ऍट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे. मराठा समाजातील तरुण मुलामुलींना प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वसतीगृह व शासकीय कर्ज याबाबत जाहीर केलेल्या सर्व योजनांची त्वरीत अंमलबजावणी व्हावी. शेतीविषयक स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरीत अंमलबजावणी करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहे. या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय फलटण शहर आणि तालुक्‍यातील मराठी बांधवानी घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)