मराठा आरक्षण याचिकेवर आज सुनावणी

मुंबई: आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजाचे सुरू असलेले आंदोलन आणि त्याला लागलेले हिंसक वळणाच्या पार्श्‍वभूमीवर गेली दोन वर्षे उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षण याचिकेवर मंगळवार, दि. 11 रोजी सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. न्यायमूर्ती आर. एम.सावंत आणि न्यायमूर्ती के. के. सोनावणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी अपेक्षीत आहे.

मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी घेण्यात यावा, जेणे करून लाखो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. यासाठी सामाजीक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात डिसेंबर 2017मध्ये याचिका दाखल केली. या याचिकेवर आज न्यायमूर्ती ए. ए. सय्यद आणि न्यायमूर्ती एस.सी. गुप्ते यांच्या खंडपीठासमोर सुनावणी निश्‍चित करण्यात आली होती. मात्र, तांत्रीक चुकीमुळे ती निश्‍चित केली गेली होती. ही तांत्रीक दुरूस्ती झाल्यानंतर न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती के.के. सोनावणे यांच्या खंडपीठासमोर निश्‍चित करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)