मराठा आरक्षण : मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची नोव्हेंबरपर्यंत प्रतिक्षा

राज्य सरकारची हायकोर्टात माहिती
मुंबई – मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अंतिम अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे. नोव्हेबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्य सरकारकडे हा अहवाल सादर केला जाईल. त्यानंतरच आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल, असे राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात स्पष्ट केले. विशेष सरकारी वकील ऍड. रवी कदम यांनी आयोगाच्या कामाचे प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली.

लाखो विद्यार्थ्यांना लाभ व्हावा म्हणून मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी घेण्यात यावा. यासाठी सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात डिसेंबर 2017 मध्ये याचिका दाखल केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेले आदोलन आणि त्याला लागलेले हिंसक वळण तसेच मराठा समाजातील तरूणांच्या आत्महत्या या पार्श्‍वभुमीवर या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती. त्या नुसार न्या. रणजीत मोरे आणि न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयोगाने नोव्हेबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अहवाल देण्याचे आश्‍वासन राज्य सरकारला दिल्याची माहितीही सरकारच्यावतीने न्यायालयात दिली गेली. तसेच मराठा समाजाचा पूर्ण तपशील पाच संस्थामार्फत जमा करण्यात आला आहे. तसेच राज्यभरातून आलेली सुमारे 2 लाख निवेदने आणि सूचनांची वर्गवारी करून 5 सप्टेंबरपर्यंत वर्गीकरणाचा अहवाल आयोगाकडे सादर केला जाईल . त्यानंतरच आयोग नोव्हेबर अहवाल सादर करेल असे न्यायालयात स्पष्ट केले. या आरक्षणाच्या मुद्यावरून होणारे आंदोलन आणि तरूणांच्या आत्महत्या पाहता राज्य सरकारने आयोगाकडून लवकरात लवकर अहवाल घेण्याचा प्रयत्न करावा आणि प्रगत अहवाल 10 सप्टेंबर पर्यंत सादर करण्याचे आदेशही राज्य सरकारला दिले.

या अहवालासाठी आयोगाला छत्रपती शिवाजी प्रबोधिनी संस्था (औरंगाबाद), रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी (मुंबई),
शारदा कन्सल्टन्सी सर्विसेस (नागपूर), गुरुकृपा विकास संस्था (कल्याण) आणि गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पोलिटिक्‍स
अँड इकॉनॉमिक्‍स (पुणे) या पाच संस्थाकडून माहिती जमा करण्याचे काम पुर्ण झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)