मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही : रामदास आठवले

भारिप व एमआयएम युती भाजपला फायदेशीर

रायगड: मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयीन लढ्यासाठी तयार आहोत, असा दावा राज्यातील भाजपा सरकारतर्फे केला जात असतानाच मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. देशात मंदिर आणि पुतळे बांधले नाहीत तर मते मिळणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. भारिप व एमआयएम युती ही भाजपला फायदेशीर असल्याचे देखील ते म्हणाले.

-Ads-

रामदास आठवले यांनी शुक्रवारी खोपोलीत पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी मराठा आरक्षणासह राम मंदिर, प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप आणि ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाच्या आघाडीबाबत मते मांडली. मराठा आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावर ते म्हणाले, मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहेच. पण हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. देशात 75 टक्के आरक्षणाचा कायदा केल्यावरच आरक्षणाचा मुद्दा सुटेल. राज्य मागास आयोगाने दिलेल्या अहवालाप्रमाणे मराठा समाजात देखील मागासांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा उच्च न्यायालयात कदाचित टिकेल. मात्र टक्‍केवारीचा विचार करता न्यायालयात हा मुद्दा टिकणार नाही, असे वाटते.

मंदिर आणि पुतळे बांधून विकास होतो का?, असा प्रश्नही आठवले यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावर आठवलेंनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले. मंदिर आणि पुतळे बांधली नाहीत तर मते मिळणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकरांनी विरोध केला तरी बाबासाहेबांचा पुतळा होणारच असे त्यांनी सांगितले.

अयोध्येत राम मंदिर व्हावे, ही कोट्यवधी लोकांची इच्छा आहे. मात्र, या जागेसंदर्भात सुप्रीम कोर्टात निकाल लागेपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. राम मंदिर बांधताना मुस्लीम समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमची युती कॉंग्रेसची मतं खाणार आणि त्याचा फायदा भाजपाला होईल, असे मत आठवले यांनी व्यक्‍त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)