मराठा आरक्षण कायद्यापुढे टिकणार का ?

राज्य सरकारने गेल्या रविवारी राज्य मागास आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या व मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारला आता कायदेशीर लढाईंचा सामना करावा लागण्याची शक्‍यता आहे. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळाल्याने या निर्णयाला कोर्टात आव्हान मिळण्याची शक्‍यता आहे.

कुणबी समाजाचा समावेश करून मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देणे शक्‍य नाही. कारण, कुणबी समाजाचा आधीच ओबीसी कोट्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कुणबी समाज मराठा समाजासोबत एसईबीसी वर्गात सामील होणार नाहीत, या निर्णयाच्या विरोधात कुणबी समाजाकडून कोर्टात आव्हान दिले जाऊ शकेल. मराठा आरक्षणाला जरी मंजुरी मिळाली असली तरी या आरक्षणासमोर कायद्याचे आव्हान उभे राहणार आहे. कायद्याच्या कक्षेत हे आरक्षण कितपत टिकणार का, हा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)