मराठा आरक्षण “ओबीसी’ प्रवर्गातून द्यावे

क्रांती मोर्चाची मागणी : आजपासून “मराठा संवाद यात्रा’

पुणे – मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यास ते न्यायालयात टिकणार नाही, अशावेळी सरकारने समाजाची दिशाभूल न करता इतर मागास प्रवर्गातून अर्थात “ओबीसी’मधून आरक्षण द्यावे. मराठा आणि कुणबी समाज एकच असून या मार्गाने मिळलेले आरक्षणच हेच टिकू शकते, अशी मागणी पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

मराठा समाज आरक्षणासाठी राज्यभरात 58 मोर्चे काढण्यात आले. यानंतर राज्य सरकारने यासाठी एक समिती नियुक्त केली होती. त्या समितीने शासनाला गुरूवारी अहवाल सादर केला आहे. तर, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे “30 नोव्हेंबर पर्यंत थांबा,’ असे सांगत आहेत.

राज्य मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला असला, तरी येत्या अधिवेशात तो विधिमंडळाच्या पटलावर मांडला पाहिजे. त्यानंतर याबाबतचा कायदा करावा लागणार आहे. या कायद्यानंतरच हे आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया त्वरीत केली, तरच या अधिवेशात हा कायदा मंजूर होईल. त्यामुळे हा दबाब मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने टाकण्यात येत आहे. त्यासाठीच “मराठा संवाद यात्रा’ काढण्यात येणार आहे, असे ही कुंजीर यांनी सांगितले.

यात्रेची सुरूवात शुक्रवारपासून (दि.16) होणार आहे. शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून यात्रेला प्रारंभ होईल. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी मुंबई विधान भवनावर या संवाद यात्रेचा समारोप होणार आहे, असे ही त्यांनी सांगितले.

आता आमचा मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्‍वास राहिला नसून त्यांनी दि.25 नोव्हेंबरपर्यंत निर्णय घ्यावा, अशी मागणी कुंजीर यांनी यावेळी केली. येत्या अधिवेशानात निर्णय न घेतल्यास भविष्यात आणखी तीव्र लढा उभारणार असल्याचा इशारा कुंजीर यांनी यावेळी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)