मराठा आरक्षण आंदोलनाला डॉक्‍टरांचाही पाठिंबा

फलटण ः छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी वैद्यकीय सेवेतील डॉक्‍टरांनी एकमुखी पाठिंबा दिला.

फलटण, दि. 2 (प्रतिनिधी) – मराठा क्रांती मोर्चाने सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाला आज फलटण शहरातील संपूर्ण वैद्यकीय सेवा बजवणाऱ्या डॉक्‍टरांनी जाहीर पाठिंबा दिला असून मराठा समाजातील लोकांना लागेल ती वैद्यकीय मदत करणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, ना. रामराजे नाईक निंबाळकर आंदोलन स्थळी भेट दिली.
येथील अधिकार गृहासमोर मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन आठव्या दिवशीही सुरू होते. यावेळी मराठा समाजातील लोकांची आरक्षणासाठी असलेली मागणी योग्य असून मराठा समाजाला राज्य सरकारने आढेवेढे न घेता आरक्षण द्यावे, अन्यथा, समाजाचा उद्रेक सरकारला सहन होणार नाही. 288 विधानसभा मतदार संघात मोठ्या संख्येने असलेला मराठा समाज व 48 लोकसभा मतदार संघात सरकारला जागा दाखवून देईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
दरम्यान, झिरपवाडी येथील मराठा समाजाच्या लोकांनी सकाळी छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाय, जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा दिल्या. यानंतर झिरपवाडीच्या युवकांनी भजन, लेझीम झांजपथक वाजवत परिसर दणाणून सोडला होता. आंदोलनात महिला युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)