मराठा आरक्षणासाठी परभणीत तरूणाची आत्महत्या 

परभणी: मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करण्याचे सत्र सुरूच आहे. आज (रविवार) आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. अनंत लेवडे-पाटील (ता. सेलू, जि. परभणी) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान देत आहे, असे त्याने आत्महत्येपूर्वी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते.
अनंत लेवडे-पाटील या तरुणाने आज सकाळी 11 वाजता एका शेतात जाऊन अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुकवर पोस्ट टाकली होती. मराठा समाजासाठी बलिदान देत आहे. देशासाठी काही करता आले नाही. मात्र, मराठा समाजासाठी बलिदान देत आहे, असे त्याने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)