मराठा आरक्षणासाठी तत्परता दाखवा

खा.उदयनराजे भोसले यांचा सरकारला इशारा
पुणे,दि.3 (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही तरी एवढी वर्षे हा प्रश्‍न सुटलेला नाही. यापुर्वीच योग्य निर्णय घेतला असता तर आज एवढे जीव गेले नसते. असे स्पष्ट करत खासदार छत्रपती उद्‌यनराजे भोसले यांनी ऍट्रॉसिटी कायदा कठोर करण्यासाठी तत्परता दाखवली तशीच तत्परता मराठा आरक्षण देण्यात का दाखविली जात नाही असा खडा सवाल उपस्थित केला.
मराठा आरक्षणासंदर्भात अहवाल तयार करणाऱ्या मागासवर्गीय आयोगाची भेट घेण्यासाठी आज खासदार छत्रपती उद्‌यनराजे भोसले पुण्यात आले होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली सडतोड मते मांडली. गेले 25 ते 30 वर्ष हा प्रश्‍न प्रलंबित आहे. आधी मूक मोर्चे निघाले. त्याची देखल जगभरात घेतली गेली. तेव्हाच हा प्रश्न सोडवला असता तर ही वेळ आली नसती. तुम्ही लोकांच्या भावना समजून घ्या, या आंदोलनाला राजकारणाशी कृपया जोडू नका. आंदोलनासाठी कुणीतरी प्रवृत्त करतं आहे, असं म्हटलं जात आहे. मात्र आंदोलकांना कुणी प्रवृत्त केलं नाही. आज या समाजावर वेळच अशी आली आहे, की याच्याशिवाय पर्याय नाही’, अशा शब्दात त्यांनी समाजाची व्यथा मांडली.
आता जे सत्तेत आहेत आणि विरोधक आहेत या सर्व राजकारण्यांनी माणुसकीच्या नात्यानं समजून घेणं आवश्‍यक आहे’, असे सांगून उद्‌यनराजे भोसले म्हणाले, ‘सरकारनं प्रस्ताव द्यावा, आम्ही त्याला संपूर्ण सहकार्य करू असं विरोधक म्हणतात, मग हे आधी का झालं नाही. असा प्रश्न आता लोकं विचारत आहे. त्याचं उत्तर आपल्याला द्यायला हवं’ दररोज वर्तमानपत्र वाचून कळतं की आरक्षणास कोणाची काही हरकत नाही. असं असताना मग अनेक वर्ष हा प्रश्न का सोडविला गेला नाही. हा त्यांच्या मनात जो प्रश्न तोच माझ्या मनात आहे. मला दोन कारण दिसतात. एक म्हणजे इच्छा शक्ती नाही, दुसरं म्हणजे आजपर्यंत घडलेलं राजकारण,
मराठा समाजासोबत धनगर-मुस्लीम या सर्वांसाठीच्या आरक्षणाचा निर्णय एकत्र आणि तत्परतेने घ्यावा, अशी भूमिका मांडताना भोसले म्हणाले. केंद्र सरकारने कालच ऍट्रॉसिटीचा कायदा पूर्ववत ठेवणार असं स्पष्ट केलं. तर देशभरातील व्यथित, उपेक्षित ज्यांना आरक्षण हवं आहे अशा मराठा-धनगर-मुस्लीम-जाट सगळ्यांना केंद्र आणि राज्य सरकारने ऍट्रॉसिटीसाठी दाखवलेल्या तत्परतेनेच आरक्षण द्यावं.
पुण्यात सर्व जिल्हा समन्वय समितीची बैठक घेण्यात येणार आहे त्यात पुढील दिशा ठरवू. आंदोलनावेळी मालमत्तेचं नुकसान होऊ नये याची काळजी घेण्यास सांगू असे त्यांनी सांगितलं.
————-

खा.उद्‌यनराजे काय म्हणाले,
मराठा, धनगर, मुस्लीमांना सर्वांना आरक्षण मिळाले पाहिजे
आत्महत्या केलेल्यांच्या दु:खात सहभागी आहोत
आरक्षण असतं तरी ही वेळ आली नसती
आत्महत्या करावी तर पैसे-नोकरी मिळेल असं म्हणणं कितपत योग्य
या लोकांना आरक्षण का दिलं गेलं नाही? हा प्रश्न सर्व लोकप्रतिनिधींना विचारा


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)