मराठा आरक्षणासाठी आणखी दोघांची आत्महत्या

मुंबई/बीड – मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यात आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. शुक्रवारी बीडमधील पिंपळनेर येथे एकाने गळफास, तर शनिवारी नवी मुंबईतील तुर्भे येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. राज्य शासन आरक्षण देत नाही, आता आम्ही काय करायचे’, असे त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

शिवाजी तुकाराम काळे (42) असे बीडमधील मयताचे नाव आहे. ते मुळचे पिंपळनेर (गणपती, ता. बीड) येथील रहिवासी होते. गेल्या काही दिवसांपासून कामानिमित्ताने ते बेडूकवाडी शिवारातील शेतवस्तीवर राहत होते. शुक्रवारी रात्री लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या शर्टच्या खिशात चिठ्ठी आढळून आली आहे. त्यामध्ये, मराठा समाजासाठी आज दिनांक 3 रोजी मी माझे जीवन संपवीत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी मराठा समाजाचा अंत पाहू नये. आरक्षण द्यावे एवढीच विनंती.. असा मजकूर लिहिला आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुस-या घटनेत तुर्भे सेक्‍टर 20 येथे राहणाऱ्या अरुण भडाळे या तरुणाने शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. अरुण हा दाना बाजार येथे माथाडी कामगार होता. त्याने खासगी वित्तसंस्थेकडून कर्ज घेतले होते. कर्जाच्या वसुलीसाठी वित्तसंस्थेने त्याच्या मागे तगादा लावला होता. आत्महत्येपूर्वी अरुण भडाळेने सुसाईड नोटही लिहून ठेवली होती.

यात त्याने दोन जणांना आत्महत्येसाठी जबाबदारही ठरवले आहे. तसेच फडणवीस सरकार आरक्षण देत नाही, आम्ही काय करायचे, असेही त्याने चिठ्ठीत म्हटले आहे. शवविच्छेदन करु नये, असे त्याने चिठ्ठीत म्हटल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)