मराठा आरक्षणासाठी अंबाबाईला साकडे

कोल्हापूर – मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारला सुबुद्धी दे असे साकडे आई अंबाबाईला घालत मंगळवारी मराठा क्रांती संघटनेच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले.

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मराठा क्रांती संघटनेच्यावतीने अंबाबाईला साकडं घालण्यात आले. त्यासाठी शिवाजी पेठेसह कोल्हापुरातील विविध तरुण मंडळे, उपनगर, करवीर येथील कार्यकर्ते सकाळी मंदिरात जमले. येथून समोर हातात चौंडकं, संबळ घेतलेले गोंधळी मागे शेकडो कार्यकर्ते हातात भगवे झेंडे, डोक्‍यावर भगवी टोपी, गळ्‌यात भगवे स्कार्फ तर भगव्या साड्या परिधान केलेल्या महिला पायी अंबाबाई मंदिराकडे निघाले.

-Ads-

महाद्वार चौकात आल्यानंतर जागर गोंधळ सुरू झाला. अंबा माता की जयचा गजर करत गोंधळींनी कोल्हापुरची अंबाबाई गोंधळाला ये म्हणत मराठा आरक्षणप्रश्नी देवीला साद घातली. गणपतीची व देवीची आरती झाल्यानंतर प्रातिनिधीक स्वरुपात दहा महिला अंबाबाई मंदिरात गेल्या. तेथे त्यांनी देवीला मराठा आरक्षणासाठी सरकारला सुबुद्धी असे साकडे घातले.

यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीच्या आणि सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर येथेच सभा विसर्जित करण्यात आली. या आंदोलनात मराठा रणरागिणी संघटना, राजमाता जिजाऊ ब्रिगेड, शिवसेना महिला आघाडी, भागिरथी महिला संस्थांनी तसेच शिवाजी पेठेतील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)