मराठा आरक्षणासंर्भातील अहवाल हायकोर्टात सादर; याचिका निकाली  

मुंबई – गेली दोन वर्ष उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणासंर्भातील याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढली. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल राज्य सरकारने न्यायालयात सादर केल्याने याचिकेचा हेतू पूर्ण झाल्याचे याचिकाकर्त्याने न्यायालयात सांगितले. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात कायदा तयार करण्याची प्रकिया सुरु असल्याचीही माहिती राज्य सरकारने न्यायालयात दिली.

राज्यात मराठा समाजाचे आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन आणि त्याला लागलेले हिंसक वळण तसेच मराठा समाजातील तरूणांच्या आत्महत्या या पार्श्‍वभूमीवर मराठा आरक्षणाचा आयोगाकडे प्रलंबित असलेला मुद्दा निश्‍चित कालमर्यादा ठरवून निकाली काढावा, अशी विनंती करणारी याचिका विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली.

दरम्यान, मराठा समाजाला एसई-बीसी (सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्‌या मागास) हा वेगळा प्रवर्ग तयार करून आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)