मराठा आरक्षणासंदर्भात बुधवारी हायकोर्टात सुनावणी 

मुंबई – मराठा आरक्षणासंदर्भात बुधवारी (२१ नोव्हेंबर) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्य मागास प्रवर्गाचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात यावा, अशी मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली लागावा यासाठी विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, राज्य मागासवर्गीय आयोगाने दिलेला अहवाल राज्य सरकारने स्वीकारला असून मराठा समाजाला एसई-बीसी (सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्‌या मागास) हा वेगळा प्रवर्ग तयार करून आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)