मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकेची सुनावणी बुधवारी 

मागासवर्गीय आयोगाचा अहवाल न्यायालयात सादर करा – याचिकाकर्त्यांची मागणी 

मुंबई, (प्रतिनिधी) : गेली दोन वर्ष उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षण याचिकेची सुनावणी बुधवार दि. 21 नोव्हेंबर रोजी होणार आहे. न्या. धर्माधिकारी आणि न्या. एस.व्ही कातवाल यांच्या खंडपीठाने या याचिकेची दखल घेऊन याचिकेची सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले आहे. तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्थापन केलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल न्यायालयात सादर करण्याबरोबराच याचिकाकर्त्यांना द्यावा, अशी विनंती याचिकाकर्त्याने न्यायालयात केली आहे.

राज्य मराठा समाजाच्याचे आरक्षणासाठी सुरू असलेले आदोलन आणि त्याला लागलेले हिंसक वळण. तसेच मराठा समाजातील तरूणांच्या आत्महत्या या पार्श्‍वभूमीवर मराठा आरक्षणाचा आयोगाकउे प्रलंबित असलेला मुद्दा निश्‍चित कालमर्यादा ठरवून निकाली काढावा अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या प्रतिक्षेमुळे याचिकेची सुनावणी प्रलंबित होती. न्यायालयाने 15 नोव्हेबर पर्यंत
आयोगाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आयोगाने 14 नोव्हेंबरला राज्य सरकारकडे अहवाल सादर केला. याकडे याचिकाकर्त्याने न्यायालयाचे लक्ष वेधले तसेच याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)