मुंबई – आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजाचे सुरू असलेले आंदोलन आणि त्याला लागलेले हिंसक वळण्याच्या पार्श्‍वभूमीवर गेली दोन वर्षे उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षण याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

न्यायमूर्ती ए. ए. सय्यद आणि न्यायमूर्ती एस. सी. गुप्ते यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.
मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी घेण्यात यावा जेणे करून लाखो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. यासाठी सामाजीक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात डिसेंबर 2017मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मागिल सुनावणीच्यावेळी न्यायालयाने मागासवर्गीय आयोगाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती, तर लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची विनंती राज्य सरकारमार्फत आयोगाला करण्यात आली आहे. मागासवर्गीय आयोगाचा अंतीम अहवाल नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत देण्याचे आश्‍वासन राज्य सरकारला दिले आहे.

सोमवारी आयोगाच्या कामाचा आढावा आणि अहवालाला लागणाऱ्या वेळबाबत चर्चा होण्याची शक्‍यता आहे. या याचिकेवर सर्व मराठा समाजाचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)