मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने दिला नकार

संग्रहित छायाचित्र

मुंबई: मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला मोठा दिलासा मिळाला आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी, महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देऊन घटनाबाह्य निर्णय घेतला आहे. घटनेनुसार 50 टक्के पेक्षा अधिक आरक्षण देता येत नाही. त्यामुळे आरक्षण रद्द करावे अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती.

मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला असून आरक्षण कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी जनहित याचिका आणि कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची विनंती करणारी याचिका, या दोन्हींवर एकत्रित प्राथमिक सुनावणी आता १० डिसेंबर रोजी होणार आहे.

-Ads-

मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात धाव घेणाऱ्या जयश्री पाटील यांचे वकील गुणरत्न सदावर्ते हे अनुपस्थित राहिल्याने मराठा आरक्षणवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत दिली होती. दुपारी 3 वाजता न्यायालयाने यावर सुनावणी पूर्ण केली आणि मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)