मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका संदिग्ध : विखे-पाटील 

मुंबई: मराठा समाजासह सर्व समाजाच्या आरक्षणाबाबत भाजप-शिवसेना सरकारची भूमिका संदिग्ध असून सरकारने धनगर समाजाची मोठी फसवणूक केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोमवारी येथे केला.

राज्य मागासवर्ग आयोगाची शिफारस मान्य करून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्‌या मागास प्रवर्ग तयार करून आरक्षण देण्याचे जाहीर केले असले तरी ते पुरेसे नाही. इतर मागासवर्गाच्या सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता ओबीसी प्रवर्गात एक वेगळा उपप्रवर्ग तयार करून त्याला स्वतंत्र 16 टक्के आरक्षण द्यायला हवे होते. परंतु, सरकारने हे जाणीवपूर्वक टाळले आहे, अशी टीकाही विखे-पाटील यांनी केली.

शेतकऱ्यांना अनुदान द्या! 
राज्यातील भीषण कोरड्या दुष्काळाची केलेली घोषणा कोरडीच आहे. सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत देणारा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सरकारने दुष्काळग्रस्तांना तातडीने हेक्‍टरी 50 हजार रूपये, फळबागा, केली तसेच उसाला हेक्‍टरी 1 लाख रूपयांचे अनुदान घोषित करावे, अशी मागणीही विखे-पाटील यांनी केली. 

-Ads-

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारी सुरूवात झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना विखे-पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारचे अपयश अधोरेखित केले. मराठा आरक्षाणबाबत सरकारने टक्केवारी जाहीर केलेली नाही. याचा अर्थ सरकारचा हेतू शुध्द नाही असे जाणवते. त्यामुळे सरकारने तातडीने राज्य मागसवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात सादर करावा आणि कृती अहवालाची माहिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी अक्षरश: घुमजाव केले आहे. निवणुकीआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आल्यास मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल, असे जाहीर केले होते. आता मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा अधिकार राज्याला नव्हे तर केंद्राला असल्याचे स्पष्ट करून कातडीबचाव भूमिका घेतल्याची टीका विखे-पाटील यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)