मराठा आरक्षणाच्या मंत्रीमंडळ उपसमिती सदस्यपदी पालकमंत्री प्रा. शिंदे 

संग्रहित छायाचित्र

जामखेड: राज्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांवरील निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीमध्ये, भटक्‍या विमुक्त जाती जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांवरील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी उपसमिती स्थापन करण्याची घोषणा मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्या अनुषंगाने महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली होती. या समितीमध्ये शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख व कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर या सहा मंत्र्यांची सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. या समितीमध्ये सातवे सदस्य म्हणून प्रा. राम शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने 15 नोव्हेंबरला काढला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)