मुंबई –  आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजाचे सुरू असलेले आंदोलन आणि त्याला लागलेले हिंसक वळणाच्या पार्श्‍वभूमीवर गेली दोन वर्षे उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षण याचिकेवर आज सुनावणी करण्यात आली. यावेळी आरक्षणासंदर्भात मागास प्रवर्ग आयोगाने प्रगती अहवाल न्यायालयाासमोर सादर केला. मागास वर्ग आयोग १५ नोव्हेंबरपर्यंत आपला अंतिम अहवाल सादर करणार आहेत. मात्र न्यायालयाने चार आठवडयांनी कामकाजाचा पुन्हा प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाला दिले आहेत.

मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी घेण्यात यावा, जेणेकरून लाखो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. यासाठी सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी न्यायालयात याचिका करून आयोगाला कालमर्यादा निश्चित करून देण्याची मागणी केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना आयोगाला चार आठवडयांनी कामकाजाचा पुन्हा प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तर सुनावणीवेळी मराठा आरक्षणाबाबत सरकार चालढकल करत असल्याचे म्हणत सरकारलाही चांगलेच झापले.

…तर एक डिसेंबरपासून पुन्हा भगवे वादळ महाराष्ट्रात घोंगवणार

राज्यभरात दुसऱ्यांदा मराठा मोर्चा निघाला. ९ ऑगस्ट रोजी झालेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चात अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घडल्या. परंतु, नोव्हेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले नाहीतर एक डिसेंबरपासून पुन्हा भगवे वादळ महाराष्ट्रात घोंगवेल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)