मराठा आरक्षणासाठी अमरावतीत आत्मदहनाचा प्रयत्न

अमरावती – राज्यभरात ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी तीव्र मोर्चे आणि आंदोलने सुरू आहेत. तसेच काही आंदोलकांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला असताना, अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मराठा समाजातील एका कार्यकर्त्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सकल मराठा समाजाच्या बैठकीच्या काही तासाआधीच हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली.

संजय महादेवराव कदम (वय 40, वडाळी, अमरावती) असे आत्मदहन करण्या-याचे नाव आहे. आज, गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास रॉकेलची बाटली हातात घेऊन तो कार्यालय परिसरात पोहोचला. दुपारची वेळ असल्याने कार्यालय आणि परिसरात वर्दळ नव्हती. त्याने रॉकेल अंगावर ओतून घेतले. त्याचवेळी तेथील पार्किंगची व्यवस्था पाहणारा कर्मचारी प्रमोद माहुरकर याने कदमचा आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर तैनात पोलिसांनी कदमला तातडीने ताब्यात घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी तृष्णा तानाजी माने (19, रा. देवळाली, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) या तरुणीने दोन दिवसांपूर्वी विषारी द्रव्य प्राशन केले होते. मात्र, उपचारदरम्यान तिचा बुधवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. देवळाली ग्रामस्थांनी शासन मराठा आरक्षणप्रश्नी दुर्लक्ष करीत असल्याने तरुणीने हे पाऊल उचलल्याचा आरोप करत तिचा अंत्यविधी न करण्याचा निर्णय घेतला होता. महसूल व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी समजूत काढून त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. यानंतर मयत तृष्णावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)