मराठा आंदोलनाविरोधात जनहित याचिका

13 ऑगस्टला सुनावणी
मुंबई – मराठा आरक्षणाबरोबरच नोकरभरतीच्या मुद्यावर मराठा समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

द्वारकानाथ पाटील यांच्या वतीने ऍड. आशिष गिरी यांनी दाखल केलेल्या याचिकेची न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने 13 ऑगस्ट रोजी सुनावणी निश्‍चित केली आहे.

-Ads-

मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्यावर मोर्चा काढून राज्य सरकारला जागे केले. परंतू मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. अखेर मराठा समाजाने आंदोलनाचे अस्त्र उपसले. राज्यात आंदोलने केली जात आहेत. महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. त्याला हिंसक वळण लागून मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असल्याने मराठा समाजाने पुकारलेला बंद बेकायदा ठरवून कार्यकत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्या. तसेच या आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान वसुल करा, अशी विनंती याचिकेत केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)